श्री मळाई महिला विकास म ंच, मलकापूर

Our Story
मार्च २००९ मध्ये श्री मळाई महिला विकास मंचची स्थापना झाली. त्यापासून आज अखेर महिला विकास मंच कार्यरत आहे. या मंचच्या माध्यमातून मलकापूर पंचक्रोशीतील महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये महिलांना आरोग्यविषयी, कॅन्सर विषयक तपासणी मार्गदर्शन, मोहन सनोत्रोग्राफी, मेमोग्राफी, पॅपस्मियर, मुत्र कंचरण तपासणी, मोफत एमआरआय स्कॅनिंग, मोफत सोनोग्राफवर तपासणी यांचे मार्गदर्शन, महिलांना कायदेविषयक स्वसंरक्षण, महिला सक्षमीकरण, बालसंगोपन, सुजाण पालकत्व, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, शेती, विविध व्यवसाय, गृहव्यवस्थापन, पालकत्व मार्गदर्शन, नेत्रामृत विकास इ. विषयी मार्गदर्शन केले जाते. तसेच अवयव दान संदर्भात जनजागृती, भव्य रक्तदान शिबीरांचे आयोजन, उन्हाळ्यात डोंगरी, वणा प्रतिपालक उपाय योजना, वृक्षारोपण, उन्हाळ्यात पा यांना पाणी देणे, कोरोनाच्या काळामध्ये श्री मळाई कोरोना हेल्पलाईन तसेच मलकापूर आपत्तीमध्ये मलकापूर प्रस्तापना म व अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या मदत इत्यादी उपक्रम राबविले आहेत.
मळाई महिला विकास मंच’ची स्थापना
आदरणीय शेतीमित्र मा. अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनातून 8 मार्च 2009 रोजी ‘मळाई महिला विकास मंच’ची स्थापना झाली.
8 मार्च 2009 चा तो दिवस अजूनही डोळ्यांसमोर तरळतो. भरदुपारी दोन वाजता मलकापूरचा मुख्य रस्ता, शिवाजी चौक आणि आ.च. विद्यालयाचा परिसर—सगळीकडे महिलांचीच लगबग. काठपदरातील साड्या, खांद्यावरचा पदर, केसातला गजरा, चेहऱ्यावरचा उत्साह आणि कुतूहल… जणू काही खास सणच!
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्याचे आमंत्रण शाळेतून मिळाल्याने सर्वच महिला एकत्र येत होत्या. त्या काळी महिलांसाठी हळदीकुंकू एवढेच कार्यक्रम प्रामुख्याने होत. ‘मेळावा’ म्हणजे काय, याचा उद्देश पत्रिकेत स्पष्ट दिला होता—
“एकविसाव्या शतकातही मुली, महिला आणि वयोवृद्ध महिलांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. शारीरिक-मानसिक त्रास, कामाच्या ठिकाणी होणारी हेळसांड, समाजातील दुय्यम दर्जा, असुरक्षितता… आणि त्याचबरोबर शिक्षण, करिअर, नोकरी, कुटुंब, मुलं, जबाबदाऱ्या ही सगळी ओझी. या सगळ्यावर एकत्र येऊन चर्चा करणे, एकमेकींना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.”
त्यातच त्या सकाळी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण जाहीर केले. रस्त्यावर चालणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगता येणार नाही असा होता.
त्या वेळी एका प्रश्नाने सगळ्यांच्या मनाला स्पर्श केला—
“तुम्ही सुशिक्षित, स्वावलंबी स्त्रिया… आजूबाजूच्या अशिक्षित, कष्टकरी, परावलंबी महिलांसाठी काय करू शकता?”
यातून ‘एक छोटासा मेळावा घेऊन बघू’ हा विचार जन्माला आला.
महिलांचा उत्साह एवढा प्रचंड होता की, त्यांचे मनोगत ऐकताना कंठ दाटून येत होता. कोणी आक्रमक, कोणी शांत विनंती करणाऱ्या, कोणी हक्काची भाषा बोलणाऱ्या, कोणी जबाबदारपणे विचार मांडणाऱ्या… प्रश्न मात्र असंख्य! दोनचे साडेपाच वाजले तरी मनोगत संपेना.
प्रमुख पाहुण्यांनी संयमाने सर्वांचे मनोगत ऐकले. “सर्वसामान्य स्त्रीच्या आवाजाला व्यासपीठ मिळाले पाहिजे” असा एकमुखी सूर उमटला—
आणि तेथेच ‘मळाई महिला विकास मंच’ स्थापन करण्याची घोषणा झाली.



संचालक मंडळ

डॉ. सौ. स्वाती रणजीत थोरात
मळाई महिला विकास मंच च्या अध्यक्षा

सौ. अरुणादेवी विठ्ठलराव पाटील
मळाई महिला विकास मंच च्या उपाध्यक्षा

सौ. शर्मिला प्रमोद श्रीखंडे
मळाई महिला विकास मंच च्या सचिव

सौ. शीला पाटील
मळाई महिला विकास मंच च्या खजिनदार


ज्योती दिपक शिंदे
मळाई महिला विकास मंच च्या सदस्यl

लता प्रकाश नलवडे
मळाई महिला विकास मंच च्या सदस्यl

वैशाली विकास शेवाळे
मळाई महिला विकास मंच च्या सदस्यl

लता बाळासो जाधव
मळाई महिला विकास मंच च्या सदस्यl
17 वैद्यकीय शिबिरे
स्त्री आरोग्य तपासणी
मोफत उपचार
दर 5 वर्षांनी TT, MMR लसीकरण
कॅन्सर शोध मोहीम – सोनोग्राफी, मेमोग्राफी, Pap smear
हाडेघनता तपासणी
मोतीबिंदू शिबिरे
रक्त तपासणी आणि मोफत औषधे
पौगंड मुला-मुलींना मार्गदर्शन
लहान मुलांचे वजनवाढ मार्गदर्शन
सुजाण पालकत्व सत्र
१६ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास
आज मागील १६ वर्षांवर नजर टाकली तर मंचाची कामकाजाची व्याप्ती आश्चर्यचकित करणारी आहे.
📌 एकूण 56 महिला मेळावे
📌 आरोग्यविषयक उपक्रम
महिला/मुलींवरील अत्याचारांविरोधात जनजागृती रॅली (पोलिस विभाग सहयोग)
वक्तृत्व गुण आणि नेतृत्वगुण विकास
अंधश्रद्धा निर्मूलन कार्य
सेंद्रिय शेती मार्गदर्शन
📌 सामाजिक भान व जनजागृती
विविध पौष्टिक पाककृती स्पर्धा
गृहव्यवस्थापन
सजावट, गौरी सजावट
केक, चॉकलेट, कॅडबरी बनविणे
व्यवसाय प्रशिक्षण — ‘स्वयंसिद्धा’
बचत गट सुविधा
बँकिंग व मार्केटिंग प्रशिक्षण
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
महिलांसाठी व मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण
📌 स्वावलंबन, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास
पारंपरिक श्रावणातील मंगळागौर
गौरीचे पारंपरिक खेळ
स्नेह संमेलन, गेट-टुगेदर
मनोरंजनात्मक खेळ
📌 सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उपक्रम
मंचाच्या वाटचालीत अनेक मान्यवर व्यक्ती व संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले--
सहयोगी संस्था
-
शासकीय रुग्णालय काले, कराड
-
कृष्णा हॉस्पिटल
-
कोल्हापूर कॅन्सर सेंटर
-
मलकापूर डॉक्टर्स असोसिएशन
-
Gynaecologist Association, Karad
-
Police Department, Karad
-
Vidnyan Prabodhini, Karad
-
Karad Athletics Association
-
Shikshak Sanghatana
-
अंधश्रद्धा निर्मूलन समिती
-
Taekwondo Association
-
Dreams Classes, Karad
श्री मळाई महिला विकास मंच, मलकापूर
आयोजित आणि यशस्वीरित्या पार पाडलेले काही कार्यक्रम
























