top of page

विज्ञान प्रबोधिनी, कराड-मलकापूर

Scientist Mixing Chemicals

Our Story

विद्यार्थी व सर्वसामान्य लोकांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी विज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना १९८४ साली करण्यात आली संस्थेचे  ८ संचालक व १२६ सभासद आहेत विज्ञान प्रबोधिनी या संस्थेमार्फत बीजारोपण वृक्षारोपण सुगंधी व आयुर्वेदिक रोपांचे वाटप फुल झाडांचे वाटप विद्यार्थी पालकांना केले जाते इत्यादी उपक्रम राबविले जातात तसेच फटाके विरहित प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली जाते विद्यार्थ्यांकडून फटाके न फोडण्याची शपथ घेतली जाते व शाळेतील गावांमध्ये फटाक्यांचे दुष्परिणाम दिवाळी त खरेदी केलेले बाहेरील भेसळयुक्त खाण्याचे पदार्थांचे होणारे दुष्परिणाम याचे तीन हजार पत्रके वाटप केली जातात 21 जानेवारी रोजी कैलास वाशी पांडुरंग पुजारी स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य निर्मिती विद्यार्थ्यांकडून केली जाते तसेच प्रगतशील शेतकरी व पशुपालक यांचा सत्कार केला जातो पर्यावरण वसुंधरा दिन साजरे केले जातात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विविध प्रादेशिक तसेच व्यसनमुक्तीसाठी जाणीव जागृती केली जाते व विविध व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित केली जातात पर्यावरण संरक्षण निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धांचे  विज्ञान छंद मेळाव्या मधून आयोजन केले जाते पक्ष्यांसाठी डोंगर परिसरामध्ये चारा व पाणी उपलब्ध करून छोटी  प्लास्टिकच्या बाटल्या मधून झाडावरती टांगले जातात असे उपक्रम राबविण्यात आले पायी चाला व निरोगी रहा हा संदेश सर्वसामान्य लोकांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची रॅली काढली जाते तसेच डिसेंबर महिन्याच्या शेवटी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते साडेतीनशे ते चारशे रक्तदाते जर वर्षी उत्स्फूर्तपणे रक्तदान करतात त्यांना अल्पोहार  व भेटवस्तू दिल्या जातात समाज उपयोगी विविध उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन विज्ञान प्रबोधिनीमार्फत केले जाते धन्यवाद.

उद्दिष्ट्ये

1. नविन वैज्ञानिक घडामोडी, बोध आणि संशोधनाची माहिती पोहोचवणे. 
2. विद्यार्थ्यांच्या विज्ञानावरील जिज्ञासा चालना देणे. 
3. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार आणि प्रयोगशीलता वाढवणे. 
4. अंधश्रद्धा व गैरसमज दूर करणारी करण्यास मदत करणारी माहिती देणे. 
5. विज्ञान क्षेत्रातील करिअर, अभ्यासक्रम, प्रवेश परिक्षा आणि संधी याबद्दल मार्गदर्शन करणे. 
6. विज्ञान प्रकल्प, मॉडेल्स, स्पर्धा आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या नवकल्पना प्रदर्शित करणे. 
7. प्रयोगाच्या वेळी घ्यावयाची सुरक्षा व उपाय योजना सांगणे. 
8. आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण इ. बाबत जागरुकता पसरवणे. 
9. विज्ञान प्रयोगशाळेतील उपकरणांची माहिती, वापर आणि खबरदारी सांगणे.

* वैशिष्ठ्ये 

1. औषधी व सुगंधी वनस्पतींचे वाटप. 
2. दर बुधवारी 'नो व्हेईकल डे'- गाडी, सायकल न वापरता पायी चालत येणे. 
3. NMMS TET, स्कॉलरशिप ऑलिम्पियाड यांसाठी साहित्य निर्मिती करुन देणे 
4. विज्ञान प्रदर्शनात सहभाग. 
5. बीजारोपण करणे. 
6. कठीण विज्ञान संकल्पना सोप्या चित्रे, ग्राफिक्स, व्हिडिओ आणि उदाहरणांवरुन समजावणे. 
7. विज्ञान प्रदर्शनासाठी कल्पना व मार्गदर्शन देणे. 
8. सुरक्षित प्रयोग व प्रयोगशाळेतील उपकरणांची माहिती देणे.

Test Tube Experiment

विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि विज्ञान रसिकांना विश्वसनीय, सोपे आणि समजण्यासारखे विज्ञान ज्ञान उपलब्ध करून देणे. 

sm30.jpeg
IMG-20251205-WA0141.jpg
sm1.jpeg
Colorful Lab Glassware

रजि. नं.: न/महा/३४४६/सातारा दि. १९/८/९६

bottom of page