कराड तालुका ॲमॅच्युअर ॲथ लेटिक्स असोसिएशन कराड

संघटनेच्या माध्यमातून आज अखेर राबवलेले विविध उपक्रम
१) तालुका स्तरावर संघटनेच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धांचे आयोजन सातारा जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांचे सहकार्याने व कराड तालुका ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या पुढाकाराने तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय सब ज्युनिअर स्पर्धांचे आयोजन करून ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी कराड येथे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंसाठी व खेळाच्या विकासासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून होत आहे.या अगोदर या संघटनेच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.
२) क्रीडा पत्रकारिता परिसंवाद आयोजित करणे कराड तालुक्यातील पाचवड या ठिकाणी क्रीडा पत्रकारिता परिसंवादाचा आयोजन प्रमुख वक्ते हिंदकेसरी मा. दिनानाथ सिंह, प्रिन्सिपल करस्पॉन्डन्स महाराष्ट्र टाइम्स चे आशिष जाधव यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करून क्रीडा क्षेत्रातील विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू क्रीडा मार्गदर्शक यांच्या उपस्थितीमध्ये करून क्रीडा क्षेत्रातील विविध घडामोडी व त्याला मिळणारे बातम्यांचे कव्हरेज म्हणजेच प्रसिद्धी यासंबंधी चर्चसत्राचे करून क्रीडा क्षेत्रातील पत्रकारितेचे योगदान याद्वारे स्पष्ट करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय राज्य राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमानंतर सलग दुसऱ्या क्रीडावर्षात कराड येथे दैत्य निवारणी सभागृह येथे आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत,राष्ट्रीय खेळाडू माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी गिर्यारोहक प्रियांका मोहिते,महाराष्ट्र राज्य ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन पदाधिकारी मा.वसंतराव भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत व सातारा जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संघटना पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार समारंभ कराड या ठिकाणी संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंच्या क्रीडा कामगिरीचा गौरव म्हणून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले.
३) संघटनेच्या माध्यमातून १ जुलै रन फॉर फार्मर्स स्पर्धेचे आयोजना रन फॉर फार्मर्स ही स्वतंत्र समिती स्थापन करून १ जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून रन फॉर फार्मर्स व सेव्ह द फार्मर्स असे ब्रीदवाक्य घेऊन सातारा,सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू व तसेच शेतकरी यांच्या समवेत रन फार फार्मर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फन रन अंतर्गत डॉक्टर्स, वकील, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी यामध्ये सहभाग घेऊन शेतकरी वर्गाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्षवेधीत शेतकरी वर्गाला पाठिंबा दिला. या स्पर्धेद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शासनाच्या शासन दरबारी न्याय मिळावा व क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शेतकरी ते खेळाडू व विविध क्षेत्रातील मान्यवर यांना व्यासपीठ मिळावे हेतूने अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याला शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
उद्दिष्टे
१) संघटनेचे मुख्य ध्येय व उद्दिष्ट हे खेळाडूंसंबंधी शास्त्रशुद्ध व तांत्रिक ज्ञान तसेच माहिती व शिक्षण देणे.
२) खेळाडूंना मान्यवर शिक्षकामार्फत क्रीडाविषयक सर्वांगीण सर्वमान्य असे ज्ञान व प्रशिक्षण देऊन दर्जेदार खेळाडू निर्माण करणे.
३) खेळाकरिता विविध मैदाने, विविध प्रकारचे क्रीडा साहित्य,वस्तू अन्य सुविधा मिळवून देणे. जिल्हा, राज्य, आंतरराज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तर खेळल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धा मध्ये भाग घेण्याचे दृष्टीने योग्य ते ज्ञान, व प्रशिक्षण क्रीडा सल्ला देणे,मदत करणे.
३) आंतरराष्ट्रीय, आंतरराज्य, आंतरजिल्हा स्तरावर विविध खेळांच्या संदर्भातील नियम, नियमावली यांची माहिती खेळाडूंना करून देणे तसेच अशा स्तरावरील स्पर्धामध्ये जास्तीत स्पर्धकांनी भाग घ्यावा व यशस्वी ठरावे म्हणून प्रयत्न करणे, प्रोत्साहन देणे, मदत करणे.
४) क्रीडाविषयक चर्चासत्र,परिषदा, प्रदर्शन, परिसंवाद,व्याख्याने,व्हिडिओ क्रीडा शो,प्रश्नमंजुषा,मान्यवर मासिके बुलेटिन, वर्तमानपत्रे इत्यादी सुविधा पुरविणे.
५) क्रीडा स्पर्धा भरवून लहान मोठ्या मुलांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करणे.
संघटनेचे कार्यकारी मंडळ
मा. अशोकराव थोरात भाऊ अध्यक्ष 9890071012
मा.शशिकांत पाटील उपाध्यक्ष 7744004266
मा.निरंजन साळुंखे उपाध्यक्ष 7796142444
मा.योगेश खराडे सचिव 7020314282
मा.प्रा. अमित माने खजिनदार 07219511777
मा.संजय वाटेगावकर सदस्य 8308621818
मा.शिवाजीराव थोरात सदस्य 9730847007
मा.दिलीप चिंचकर सदस्य 9850042444
मा.संजय राठोड सदस्य 9623629301

रजि. नं.: न/महा/२०८६/सातारा
संघटनेची स्थापना २१/०१/१९९९
कराड तालुका ॲमेच्युअर ॲथलेटिक्स असो. कराड

1)खेळाडूंना प्रशिक्षित करणे व खेळातील बदल समजावून देणे.
2)आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन देणे.
3)क्रीडा परिसंवादाचे आयोजन करणे.
महत्वपूर्ण उपक्रम

1)जिल्हास्तरीय सबज्यूनिअर स्पर्धांचे आयोजन व संयोजन करणे.
2) एक जुलै रन फॉर फॉर्मर मॅरेथॉन स्पर्धा नियोजन.
कराड तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा

































