top of page
download.jpeg

श्री मळाईदेवी शिक्षण संस्था

Elementary School

Our Story

श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर  ही कराडमधील मलकापूर येथे स्थित असलेली शैक्षणिक संस्था , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष ब्रह्मर्षीभूत गंगाध्रव वासुदेव चैतन्य महाराज व सचिव श्री. अशोकराव थोरात (भाऊ) यांनी १८ जून १९७३ साली श्री मकाईदेवी शिक्षण संस्थेची स्थापना केली.

सन १९८१ साली इ. ८ वीच्या एका वर्गाने माध्यमिक विद्यालयाची सुरुवात झाली. त्यानंतर १९८४ साली मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कन्याशाळेची स्थापना केली. अशा प्रकारे संस्थेच्या यशोशिखराकडे घोडदौड सुरू झाली. आज या संस्थेची एकूण ४ माध्यमिक विद्यालये, ३ प्राथमिक विद्यालये, २ बालवाड्या, १ इंग्लिश मीडियम स्कूल तसेच २ जुनिअर कॉलेज असा विस्तार झाला आहे.

तत्कालीन विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संस्थेच्यावतीने अनेक उपक्रम राबविले जातात. समाजातील गरीब, मध्यमवर्गीय व वंचित विद्यार्थी-विद्यार्थिनींना बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर दर्जेदार व प्रगत शिक्षण मिळावे हाच संस्थेचा, संस्थेच्या सर्व विद्यालयांचा व शिक्षकांचा एकमेव उद्देश आहे. आज आमच्या विविध विद्यालयांमध्ये एकूण ५००० विद्यार्थी ज्ञान घेत आहेत. ज्ञानदानाचे पवित्र काम १५० शिक्षक करीत आहेत.

शिक्षण क्षेत्रात शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे. तसेच २०२१-२०२२ पासून संस्थेतील हुशार विद्यार्थ्यांसाठी श्री मकाई शिष्यवृत्ती परीक्षा मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून इ. ४ थी व इ. ७ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा ठेवली आहे. व शासकीय नियमानुसार जे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होतील त्यांना संस्थेच्यावतीने शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठीही संस्थेने हा वेगळा उपक्रम सुरू केला आहे.

School yard exercise, Nha Trang, Vietnam

शैक्षणिक यश, पुरस्कार

संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांनी राज्यस्तरीय मंथन परीक्षा आणि एसएससी मार्च २०२५ च्या परीक्षांसह परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकाल मिळवले आहेत.

द स्टार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने मेरिटोरियस स्कूल पुरस्कारात प्रथम पारितोषिक जिंकले आहे.

संस्था युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे, बातम्या आणि कामगिरी शेअर करत असते.

प्रत्येक शाळेची स्वतःची ऑपरेटिव्ह वेबसाइट आहे.

प्रत्येक शाळा सहभागात सक्रिय आहे आणि विद्यार्थ्यांना भरपूर संधी प्रदान करते.

संस्थापक ब्रम्हीभूत गंगाधर वासुदेव चैतन्य महाराज.jpg

 श्री मळाईग्रुपचे सर्वेसर्वा

संस्थापक ब्रम्हीभूत गंगाधर वासुदेव चैतन्य महाराज

श्री अशोकराव थोरात - शेतीमित्र

अध्यक्ष, सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ, सातारा

उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महासंघ, पुणे

संस्थेचे सचिव मा.अशोकराव किसन  थोरात भाऊ.jpg
संस्थेचे अध्यक्ष मा.पांडुरंग गणपती पाटील.jpg

मा.पांडुरंग गणपती पाटील

संस्थेचे अध्यक्ष

संस्थेचे उपाध्यक्ष मा.भास्करराव बाबुराव  पाटील.jpg

मा.भास्करराव बाबुराव  पाटील

संस्थेचे उपाध्यक्ष

संस्थेचे खजिनदार मा.तुळशीराम शंकर  शिर्के.jpeg

मा.तुळशीराम शंकर  शिर्के

संस्थेचे खजिनदार

संस्थेचे संचालक मा.वसंतराव चंद्रु चव्हाण.jpg

मा.वसंतराव चंद्रु चव्हाण

संस्थेचे संचालक

संस्थेचे संचालक मा.प्रा.संजय जोतिराम थोरात.jpeg

मा.प्रा.संजय जोतिराम थोरात

संस्थेचे संचालक

संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ.स्वाती रणजित  थोरात.jpg

डॉ.स्वाती रणजित  थोरात

संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका

WhatsApp Image 2026-01-23 at 3.08.28 PM.jpeg

संस्थेचे वरिष्ठ लेखनिक – रमेश गणपती हिंगसे

9921568564

Document from Ace Solution.jpg

संस्था लेखनिक – अंजली संग्राम पाखले
aspakhale1234@gmail.com
9921347468

Bright School Hallway
भव्य, प्रशस्त व सुंदर इमारत व निसर्गरम्य परिसर. 
इ. ५ वी ते १२ वी त्रिकालची उत्कृष्ट परंपरा. 
इ. ५ वी ते १२ वी सेमी इंग्रजी माध्यमाची सोय. 
मोफत व माफक फीमध्ये आवश्यक पुस्तके पुरविणे. 
तज्ञ व अनुभवी शिक्षकांचे वर्ग. 
स्वतंत्र प्रयोगशाळा व अद्ययावत संगणक कक्ष व डिजिटल क्लासरूम. 
इ. ५ वी ते ८ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन. 
इ. ९ वी ते १२ वी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन व विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
 विद्यार्थ्यांसाठी विशेष दक्षता व मार्गदर्शन सुविधा. 
बालविकास व पालक प्रशिक्षण वर्ग. 
नैसर्गिक लक्ष व अनुभवी शिक्षक वर्ग. 
वैकल्पिक शिक्षणाची सोय.

शैक्षणिक सुविधा

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (UPSC/MPSC/CET/JEE/NEET/इतर).  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आंतरशालेय पातळीवरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन.  राष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन व मुल्लांभट्टी इ. आर. एस. पी./एन.सी.सी. प्रशिक्षण. 
विज्ञान शिक्षणाचे विविध उपक्रम.  सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.  समाजसेवा व समाज कल्याण उपक्रम.  समुपदेशन व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम.  स्वतंत्र ग्रंथालय व अद्ययावत पुस्तके.  ज्यास्तीच्या सोयी उपलब्ध.

शैक्षणिक उपक्रम

 विद्यार्थिनी सुरक्षा-CCTV कॅमेरा व मार्गदर्शन. 
उत्कृष्ट निकालाची परंपरा. 
राष्ट्रीय स्तरावरील खेळामध्ये सहभाग.
स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त.
ग्रामीण भागातील गुणवत्तेची परंपरा.
  शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना. 
माजी विद्यार्थी निधी योजना. 
आंतरराष्ट्रीय खेळात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार. 
नैसर्गिक लक्ष व अनुभवी शिक्षक वर्ग.

इतर सुविधा

Children's Storybooks

कराडमधील मलकापूर येथे स्थित असलेली ही शैक्षणिक संस्था, जी खालील शाळा चालवते

(2).jpg

Vision & Mission

"We are committed to providing a supportive & inclusive learning environment that fosters academic excellence, personal growth, & social responsibility."

"Our institution is dedicated to delivering high quality education, character development & etiquette training, empowering students to reach their full potential."

Kanyashall final फोटो.jpg

(स्थापना दि. ७-६-१९८४)जा.क्र.एस्.-२/नं. शाळा/को.वि. १२७४३-४७ कोल्हापूर दि. १८-६-८४

यु डायस नंबर -27310221510

ग्रामीण भागातील व परिसरातील विद्यार्थिनींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून संस्थेने स्वतंत्र कन्याशाळा स्थापन सन १९८४ मध्ये केली. सध्या विद्यालयामध्ये इ. ५ वी ते १० वीच्या एकूण २३ तुकड्या असून ५९७ इतकी विद्यार्थिनींची संख्या आहे. शाळेकडे नियमानुसार नियुक्त असलेले १८ शिक्षक व ६ शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. आजपर्यंत या विद्यालयाने ग्रामीण परिसरामधून येणाऱ्या विद्यार्थिनी असूनही उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना शुल्क व निवास व्यवस्था लाभ देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन दिले आहे.

IMG-20250504-WA0000 - Copy.jpg

जा. क्र. प्रा..-२/नखाप्रशा/कोवि/२६८९६-९७
दि. ०९/०८/२००४
९८८१५६१७९४ / ७०५७७९९०८२
विद्यालयाची स्थापना जून २००३ मध्ये झाली असून इ. बालवाडी  व इ. १ली ते ७ वी मध्ये ५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून १९ शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. व विद्यार्थ्यांच्या स्वच्छता व सुरक्षिततेसाठी १ शिपाई व १ दायी  कार्यरत आहे. इ. बालवाडी  ते ७ वी सेमी इंग्रजीची सोय आहे.

VJS09980_JPG.avif

रजी.नं. एस .एस. एन./  १०८६/६७८७/एन मा.शि.१ शि. से. वि. मुंबई 
स्थापना- २९/०७/८३ UDISE NO :२७३१०२०९७०२
मोबा . ९९२२२७५७०३, ९३५९७१६९२३
परिसरातील सर्वसामान्य लोकांसाठी या विद्यालयाची स्थापना सन १९८३ रोजी झाली असून विद्यालयांमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Picture3_edited.avif

जा. क्र.: प्रा.-२/न/शाळा/कोवि/ २६८१९६-९७ दि. १/८/२००४ मोबा.: ९८८१९६९०९६ / ९०५५७१९०८९

विद्यालयाची स्थापना जून २००३ मध्ये झाली असून इ. १ ली ते ८ वी मध्ये ३५६ विद्यार्थी शिक्षण घेत असून १५ शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. व विद्यार्थ्यांच्या स्वच्छता व सुरक्षिततेसाठी १ शिपाई कार्यरत आहे. इ. १ ली ते ८ वी सेमी इंग्रजीची सोय आहे.

WhatsApp Image 2025-03-22 at 07.57.25_039b1e18.jpg

जा. क्र.: एस-१/मान्यता/कोवि-८१४१९५-१८, दि. २१/८/१९८६ जा. क्र.: उमा-१/क. म. /मान्यता/ २००२-०३/१९५९-६३ दि. २०/११/२००२ स्थापना: २१/८/१९८६

स्थापना ज्यु. कॉ.: २०/११/२०००

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांचे शैक्षणिक कल्याण साधावे या उद्देशाने श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेने १९८६ मध्ये मलकापूर या ठिकाणी आ. च. विद्यालय सुरु केले. या विद्यालयामध्ये शिक्षणाची गती सतत वाढून सन २००० मध्ये आदर्श ज्युनिअर कॉलेजची स्थापना करण्यात आली.

1000197547.jpg

जा. क्र.: एस-१/मान्यता/कोवि ७४९५७-५८ कोल्हापूर दि.: २१/११/२००३

शाळा सांकेतिक क्र.: २१.०२.०९९

स्थापना: २१/६/१९९८

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून विद्यालयाची स्थापना जून १९९८ रोजी केली. सध्या विद्यालयात इ. ६ ते १० वीचे ३ वर्गमधून १५० विद्यार्थी शिक्षण घेत असून ८ शिक्षक अध्यापनाचे कार्य करत आहेत. तसेच १ शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. विद्यालयाचा इ. १० वीचा मार्च २०१९ चा निकाल १००% इतका लागला आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी रांगोळी, चित्रकला, मेहंदी, वक्तृत्व या बाह्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यालयने ग्रामीण भागात अल्पावधीत नाव लौकिक मिळविला आहे.

Colorful Soap Bubbles
Varieties of Grain

क्रांतीज्योती विद्यार्थिनी सह. ग्राहक संस्था मर्या. मलकापूर

नोंदणी क्र.: एन.आय.टी. / के.आर.डी. / सी.ओ.एन. / ७०४/१९९९ स्थापना: २५/३/१९९९

विद्यार्थिनींना ग्राहक भांडवल व शैक्षणिक साहित्य अल्प दरात पुरविले जाते.

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने चालवलेली

जीवनज्योती सह. विद्यार्थी ग्राहक संस्था मर्या. पोतले

नोंदणी क्र.: एन. आय. टी./के. आर. डी./ सी. ओ. एन. /७०४/१९९९ स्थापना: २८/११/१९९३

सर्व शालेय साहित्य अल्प दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.

आनंद विद्यार्थी सह. ग्राहक भांडार मर्या. मलकापूर

नोंदणी क्र.: एन. आय. टी./के. आर. डी./सी. ओ. एस./७१५/१९८६-८७ स्थापना: ३०/१०/१९८६

विद्यार्थ्यांना ग्राहक भांडारातून सर्व शैक्षणिक साहित्य अल्प दरात उपलब्ध करून दिले जाते.

bottom of page