समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय, मलकापूर
रजि. नं.: न/महा/एस-१३६९/सातारा दि. १९/८/१९
मोबा.: ९८९०००९०९२


Our Story
समाज मनाला प्रगल्भ करण्याची क्षमता असणारा ज्ञानाचा चिरंतन स्रोत म्हणजे ग्रंथालये। सार्वजनिक ग्रंथालये हे समाज प्रबोधनाचे एक महत्त्वाचे साधन असून सृजाण व सुसंस्कृत नागरिक घडणीमध्ये व त्याद्वारे अंतिमतः राष्ट्र घडणीच्या कामात त्यांचे महत्व अनन्य साधारण आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील जनतेला सामाजिक, शैक्षणिक व सर्व क्षेत्रातील विविध बाबींची आणि विविध विषयांची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 अस्तित्वात आलाआहे.
समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर ता. कराड जि. सातारा हे वाचनालय "वाचाल तर वाचाल" हे ब्रीद वाक्य घेऊन सन १२/०८/१९९२ रोजी स्थापन झाले . मा. श्री. अशोकराव किसन थोरात यांच्या कल्पक नेतृत्वाने आणि मलकापुरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने हे वाचनालय सुरु झाले. सुरुवातीला अट्ठेचाळीस सभासदांच्या सहकार्याने हे वाचनालय सुरु झाले. आज नगरपरिषद इमारतीमध्ये दिमाखात उभे असणाऱ्या या ग्रंथमंदिरात वाचकांची पाऊले आपोआप वाचनालयाकडे वळू लागली.
मलकापूरातील नागरिक हे सुशिक्षित व वैचारिक जाण असणारे आहेत त्यामुळे त्यानी नेहमीच वाचनालयाला मदत केली. आज मलकापूर परिसरातील दररोज शंभर ते दिडशे ग्रामस्थ, विद्यार्थी येथे ग्रंथालयातील पेपर, मासिके, पुस्तके वाचण्यासाठी येऊ लागली यामुळे ग्रंथालयाचा वाचक वर्ग वाढू लागला.
प्रथम तुटपुंज्या "ड " वर्गातील अनूदानावर अवलंबून असणारे ग्रंथालय आज "ब" वर्गात गेले आहे. जास्तीत जास्त सोयी सुविधा येथे विनामूल्य उपलब्ध करून शासनाचा मुक्तद्वार ग्रंथालय हा अजेंडा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. आज ग्रंथांच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या असताना कमीत कमी वर्गणी घेऊन लोकांना मोठ्या किंमतीची दर्जेदार पुस्तके घरी वाचायला दिली जातात. गरीब , होतकरु मुलांना विनामूल्य सभासदत्व दिले जाते.
शाळेतील विद्यार्थी ग्रंथालयाकडे आकर्षीत व्हावेत म्हणून श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आठ शैक्षणिक शाखा आणि श्री मळाईदेवी नागरी सह. पतसंस्था ग्रंथालयाने दत्तक घेतली असून
हया शाखांना "वाचनालय आपल्या दारी" उपक्रमांतर्गत मोफत ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून दिले जातात.
वाचनालयात MPSC/ स्पर्धा परिक्षाची व्याख्याने तसेच महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीच्या अनुषंगाने व्याख्याने आयोजित केली जातात, ग्रंथालयात बाल विभाग, महिला विभाग तसेच वृत्तपत्र व मासिके वाचनकक्ष वेगवेगळे आहेत. वाचनालयात वाचनासाठी येणाऱ्या वाचकांना शुद्ध पाण्याची सोय केलेली आहे. ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षी जेष्ठ नागरीक तसेच विविध क्षेत्रात नैपुण्यप्राप्त केलेल्या विद्यार्थी, मान्यवरांचा ग्रंथ भेट व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतो. वाचकांची गरज लक्षात घेऊन जास्तीत जास्त सोयी, अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा ग्रंथालयाचा उद्देश आहे.
मलकापूर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना वाचनालयात येऊन यांच्या माध्यमातून ज्ञान व्यवि, स्वताला घडवावे, समाजाला घडवावे आणि त्यातून एक सक्षम, मजबूत, संस्कारी, संपन्न नागरिक घडावा यासाठी ग्रंथालय नेहमी तत्पर असते. तसेच सक्षम अधिकारी व ज्ञानसंपन्न नागरिक घडविणाऱ्या या वाचनालयाच्या माध्यमातून आपण सर्वांनी वाचन संकल्प करू या!
"वाचाल तर वाचाल "!
एकूण पुस्तक संख्या – १२२४३
एकूण सभासद – ६६३
आजीव सभासद – ३८३
सामान्य सभासद – २३०
एकूण नियतकालिके – ३०
एकूण दिवाळी अंक – ६५
एकूण वर्तमानपत्र – ८
वैशिष्ट्ये:
माफक फी मध्ये सभासदत्व
सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत वाचनाची संधी
एकही दिवस सुटी नाही
माहितीपूर्ण पुस्तकांचा खजिना
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक पुस्तके
२०१६ — स्व. जयवंतराव भोसले आदर्श ग्रंथपाल पुरस्कार
१६ डिसेंबर २०१८ — यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामीण ग्रंथालय पुरस्कार (सातारा जिल्हा ग्रंथालय संघ)

क्र.
१
२
३
४
५
६
७
८
९
विश्वस्ताचे नाव
श्री. अशोकराव किसन थोरात
सौ. सुरेखा धनंजय खंडाळगे
श्री. विशांत अशोकराव थोरात
श्री. मारुती पिरगोडा फराळे
श्री. सुधाकर बापूराव शिंदे
सौ. रंजना हरिबा काटवटे
सौ. सविता धनाजी कोळी
श्री. सुधीर शिवाजी लाडे
श्री. दत्तात्रय राजाराम शिर्के
पदनाम
अध्यक्ष
उपाध्यक्ष
सचिव
खजिनदार
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्य
मोबाईल क्रमांक
9890071012
9518776092
9890603137
8830550618
8830207770
9881562438
8275912144
9421121703
9921374568

मा. श्री. अशोकराव थोरात (भाऊ)
'एक चालते-फिरते वाचनालय'
मा. श्री. अशोकराव थोरात (भाऊ) हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून, ज्ञानाचा आणि अनुभवाचा एक चालते-फिरते वाचनालय आहेत. त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्पा, त्यांचे कार्य, आणि त्यांचे विचार हे एका समृद्ध ग्रंथाप्रमाणे असून, ते ज्यांच्या संपर्कात येतात, त्यांना आपोआपच ज्ञान आणि विचारांची दिशा मिळते.
📚 अखंड वाचन आणि चिंतन
भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे अखंड वाचन. त्यांना अनेक विषयांची सखोल माहिती असते, जी केवळ पुस्तके वाचूनच नव्हे, तर त्यावर चिंतन करून आत्मसात केलेली असते. राजकारण, समाजकारण, साहित्य, इतिहास, अर्थशास्त्र किंवा शेती - कोणताही विषय असो, भाऊंकडे त्या विषयावर अभ्यासपूर्ण मत आणि माहितीचा खजिना तयार असतो. त्यांच्यासाठी वाचन ही सवय नसून, ती एक जीवनशैली आहे.
💡 विचारांचे प्रसारण
वाचनालयाचे कार्य ज्ञान साठवणे आणि प्रसारित करणे असते. भाऊंच्या बाबतीत हेच घडते. त्यांनी मिळवलेले ज्ञान ते केवळ स्वतःपुरते ठेवत नाहीत, तर त्यांच्या बोलण्यातून, भाषणातून आणि चर्चेतून ते इतरांपर्यंत पोहोचवतात. त्यांची चर्चा नेहमी माहितीपूर्ण आणि दिशादर्शक असते.
चर्चासत्रे: त्यांच्यासोबत होणारी कोणतीही चर्चा ही एका उत्तम चर्चासत्रासारखी असते, जिथे प्रश्न विचारले जातात, उत्तरे दिली जातात आणि विचारांचे आदानप्रदान होते.
मार्गदर्शन: तरुण पिढीला किंवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते केवळ राजकीय किंवा सामाजिक बाबींवर बोलत नाहीत, तर त्यांना आवश्यक असणाऱ्या विविध ग्रंथांचे संदर्भ देतात.
👥 जनतेच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास
वाचनालयातील पुस्तके आपल्याला जगाची माहिती देतात. त्याचप्रमाणे, भाऊंनी जनतेच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर आधारित आपली भूमिका तयार केली आहे. त्यांचे प्रत्येक विधान किंवा निर्णय हा केवळ भावनिक नसतो, तर त्यामागे अभ्यास आणि आकडेवारी यांचा आधार असतो. ते केवळ समस्या मांडत नाहीत, तर त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी विविध विचारवंतांचे दाखले देतात, ज्यामुळे त्यांच्या मताला एक वेगळी धार येते.
🌟 आधुनिकतेची कास
उत्तम वाचनालय केवळ जुन्याच पुस्तकांवर अवलंबून नसते, तर ते आधुनिक ज्ञानालाही सामावून घेते. भाऊंनी आपल्या कार्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन विचारप्रवाहांना नेहमीच स्थान दिले आहे. जुन्या आणि नव्या विचारांचा योग्य समन्वय साधून त्यांनी आपल्या 'वाचनालया'ला नेहमीच ताजेतवाने ठेवले आहे.
💐 निष्कर्ष
मा. श्री. अशोकराव थोरात (भाऊ) हे खऱ्या अर्थाने एक चालते-फिरते ज्ञानपीठ आहेत. त्यांच्यातील ज्ञाननिष्ठा, विचारांची स्पष्टता आणि जनतेच्या प्रश्नांबद्दलचा सखोल अभ्यास यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी ठरते. त्यांचे जीवन आणि कार्य हे अनेकांसाठी प्रेरणास्रोत असून, ते आपल्या कृतीतून आणि विचारातून समाजात ज्ञानाचा दिवा तेवत ठेवत आहेत.
सौ.वैशाली विकास शेवाळे
M. A. M.Lib.& I. Sc. M. Ed.

महाराष्ट्र राज्य हे देशातील पुरोगामी, प्रबळ व प्रदीर्घ सांस्कृतिक वारसा लाभलेले राज्य आहे. संघटना व व्यक्तीच्या प्रयत्नामधून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९६७ साली महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील चौथे राज्य आहे. 'जनतेचे नेतृत्व, कार्यकर्त्याचे कर्तृत्व, दात्यांचे दातृत्व व शासनाचे पितृत्व" यावर राज्यातील ग्रंथालय चळवळीच्या सर्वांगीण विकासाची सारी भिस्त राहणार आहे, अशी भूमिका तत्कालीन शिक्षणमंत्री कै. मधुकरराव चौधरी यांनी शासनातर्फे स्पष्ट केली. "१९६७ साली अंमलबजावणी झाली व ग्रंथालय संचालनालय या स्वतंत्र्य विभागाची दि. २ मे 1968 रोजी स्थापना झाली.
यातूनच प्रेरणा घेऊन समाजसेवा व ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याकरिता १२/०८/१९९२ रोजी शेतीमित्र मा. श्री. अशोकराव थोरात भाऊ यांनी 'समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय " या संस्थेची स्थापना करून समाजाची सेवा करण्याकरिता व ज्ञानाची भूक भागविण्याकरिता ही संस्था लोकांच्या सेवेस रुजू झाली.
समाज प्रबोधन सार्व.वाचनालय ही संस्था आजपर्यंत अविरतपणे काम करत असताना त्यामध्ये मला भाऊंनी २०२२ पासून ग्रंथपाल' या पदावर काम करण्याची संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी असून मी माझ्या परीने ग्रंथालय जास्तीत जास्त अद्यावत करण्याचा प्रयत्न करीन. या ग्रंथालयात रूजू झाल्यापासून मला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या व नवीन उपक्रम राबविता आले. या सर्व कामात भाऊंसोबतच मला उपाध्यक्षा सौ सुरेखा खंडागळे मॅडम यांचेही मोलाचे मार्गदर्शन व साथ मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तसेच सर्व संचालक सदस्य यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहिन. तसेच सर्व सभासदांनी मला केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते.
अध्यक्ष मा. श्री. अशोकराव थोरात भाऊ यांनी उभ्या केलेल्या या ज्ञानमंदीरामध्ये काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करण्याचा व या ज्ञानमंदिराचा विस्तार करायाचा प्रयत्न करीन
धन्यवाद।

वाचनालयास मिळालेले पुरस्कार

Events Gallery

News Section


































































