श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जखिणवाडी
नोंदणी क्र.: R.No. SAT/KRD/RSR/CR/74A/21-7-87
तात्काळ कर्ज वितरण
कोअर बँकिंग सुविधा
एनईएफटी आणि आरटीजीएस सुविधा
क्यूआर कोड पेमेंट सुविधा
सतत ऑडिट वर्ग 'अ'
सभासदांना १०% लाभांश



Our Story
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जखिणवाडी, ही कराड, महाराष्ट्र, भारतातील एक सहकारी पतसंस्था आहे जी आर्थिक सेवा देते. ही एक नोंदणीकृत सहकारी संस्था आहे, जी पारंपारिक बँकांना पर्याय म्हणून काम करण्याची आणि तिच्या सदस्यांना विविध सेवा देण्याची क्षमता आहे.
श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अशोकराव थोरात (भाऊ) यांच्या प्रेरणेतून व चेअरमन श्री. तानाजी रामचंद्र नलवडे व व्हा. चेअरमन श्री. निवृत्ती विठ्ठल शिंदे यांच्या प्रयत्नातून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात माजी सहकार मंत्री कै. विलासराव पाटील उंडाळकर (काका) यांनी संस्थेला मंजुरी पत्र दिले. चेअरमन श्री. तानाजी रामचंद्र नलवडे व 10 व्यक्तींचे संचालक मंडळ स्थापन करण्यात आले.
21 जुलै 1987 रोजी थोरात मळा मलकापूर येथील छोट्याशा पत्र्याचे शेड उभा करून संस्थेच्या कामकाजास सुरुवात झाली. मळाई ग्रुप मधील शिक्षण संस्था व इतर संस्थांना आर्थिक आधार मिळावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. प्राथमिक स्वरूपात गरजू लोकांना पतपुरवठा करणे व लोकांच्या शिल्लकी रक्कमा व्याजाने ठेवून घेणे म्हणजेच ठेव स्वीकारणे, या उद्देशाने पतसंस्थेची स्थापना झाली आहे.
श्री. मळाईदेवीच्या प्रेरणेने मा. भाऊंचे कल्पनेतून सुरुवातीस 100/- रु शेअर्सचे माध्यमातून 367 सभासदांकडून 104350/- इतके भागभांडवल जमा करून नांदलापूर, कापील, जखिणवाडी, मलकापूर येथील निष्ठावंत कार्यकर्ते नांदलापूरचे निवृत्ती शिंदे (आण्णा), कृष्णा हरी शिंदे, जगन्नाथ बळी लावंड, प्रल्हाद दादू शिंदे, कापीलचे शामराव पवार, भाऊसाहेब आबा मोरे, जखिणवाडीचे संपतराव शामराव पाटील, पांडुरंग तुकाराम पाटील, जगन्नाथ अर्जुन झिमरे, सुखदेव विठ्ठल येडगे, धोंडीराम बंडू पाटील, दिनकर हरिबा झिमरे, या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन 21 जुलै 1987 रोजी संस्थेची स्थापना करण्यात आली.
संचालक मंडळाबरोबर खऱ्या अर्थाने सहकारातील लोकशाही टिकवण्यासाठी ज्येष्ठ सभासदांचे सल्लागार मंडळ नेमण्यात आले. या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष पद मा. श्री. अशोकराव थोरात (भाऊ) यांचेकडे ठेवून हे सल्लागार मंडळ संचालक मंडळाच्या मिटिंगला उपस्थित राहून सल्ला देण्याचे व कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहेत. संचालक मंडळाबरोबर सर्व अधिकार सल्लागार मंडळाला देण्यात आले आहे.
आज 1987 ते 2025 या 38 वर्षांच्या कालावधीत संस्थेचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सहकारामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे तरच या चक्रव्यूहाला उर्जितावस्था प्राप्त होऊ शकते. ग्रामीण भागातील लोक शहराकडे धावत आहेत, ते थांबले पाहिजेत. पतसंस्था चांगल्या प्रकारे चालवल्या गेल्या तर ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो. ती ताकद सहकारात आहे. ग्रामीण सहकार चळवळ जोमाने वाढून तरुणांनी सहकारात प्रवेश करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मा. भाऊंनी सहकारातून ग्रामविकास हे सूत्र आज अखंड जपले आहे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून पतसंस्थेचा शाखा विस्तार ग्रामीण भागात केला आहे. ज्या ठिकाणी कोणतीही बँकिंग सुविधा नाही अशा खेड्यांमध्ये पतसंस्थेच्या शाखा आहेत. म्हणजेच ग्रामीण भागात पतसंस्था विखुरलेली आहे.
अशोकराव थोरात भाऊ यांनी दिनांक 21 जुलै 1987 रोजी केली गेल्या 39 वर्षांमध्ये संस्थेने 21 शाखा व मुख्य कार्यालय अशा 22 शाखा मधून बँकिंग सेवा सुरू केली असून संस्थेच्या एकूण शाखांपैकी 18 शाखा स्व-मालकीच्या इमारतीत आहेत. श्रीमळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करीत असताना डोळ्यापुढे एक सामाजिक उद्दिष्ट होते त्या काळामध्ये गरीब शेतकरी शेतमजूर लघुउद्योजक रिक्षाव्यवसायिक यांची बँकांमध्ये पत नसल्याने त्यांना आवश्यक ते अर्थसहाय्य मिळत नव्हते त्यांची बाजारात पत नाही अशा लोकांची पत निर्माण करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून संस्थेच्या कामकाजास सुरुवात झाली.



श्री अजित थोरात (काका)
चेअरमन
मी श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन या नात्याने आपणा सर्व सभासद बांधव-भगिनींचे स्वागत करीत आहे
संस्थेचा सुरुवातीचा कारभार फक्त एका शाखेमधून केला जात होता पण काळाची गरज ओळखून सन 1996 पासून संस्थेने शाखा विस्तार करण्याचे ठरवले व त्याप्रमाणे वाटचाल करून आज संस्थेची 21 वी शाखा मल्हारपेठ मध्ये स्थापन करत असताना आम्हास आत्यानंद होत आहे सन 1987 मध्ये लावलेले हे छोटेसे रोपटे आज वटवृक्ष बनले आहे मल्हार पेठ येथील शाखा ही संस्थेच्या प्रगतीतील आणखी एक महत्त्वाची पायरी आहे तसेच संस्थेने NEFT RTGS व QR कोड या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी संस्थेच्या सर्व सुविधांचा व विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे चेअरमन माननीय श्री अजित थोरात (काका) करत आहे .
31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात पतसंस्थेने रक्कम रुपये 283 कोटी रुपयांचे व्यवसाय उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संस्थेला 4 कोटी 19 लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने भविष्यात संस्थेची क्षमता व स्थैर्य असेच सक्षम राहण्यासाठी संस्थेने एन.पी.ए. ची 100% तरतूद केली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्था 10% दराने लाभांश देणार आहे. त्याबरोबरच सर्व शाखांमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी व संस्था वाढीच्या दृष्टीने मलकापूर ता. पाटण व कुसूर ता. कराड या ठिकाणी नवीन शाखा सुरू करण्यात आल्या व भविष्यात नवीन तीन शाखा सुरू करण्याचा विचार आहे.
सहकार खात्याचे असणारे निकष पूर्ण करून पतसंस्थेने आर्थिकदृष्ट्या सुदृढ व स्वनियंत्रित पतसंस्थेचा दर्जा संपादन केला आहे. संस्था स्थापनेपासून सतत अ वर्ग संपादन केला आहे. आजअखेर संस्थेकडे 9081 सभासद असून 31 मार्च 2025 अखेर 162 कोटी ठेवी आहेत व गरजू लोकांना 122 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विविध बँकांमध्ये 64 कोटी रुपयांची मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली आहे. संस्थेचे वसूल 11 कोटी 94 लाख असून 12 कोटी 16 लाख रकमेचे इतर निधी संस्थेने उभा केले आहे. सहकार कायद्याप्रमाणे कामकाज करून 2 कोटी 64 लाख रुपयांचा निव्वळ नफा संपादन केला आहे.
आर्थिक उन्नतीबरोबरच संस्था सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर असते. मळाई समूह मधील एक घटक म्हणून श्री. मळाईदेवी पतसंस्था विविध उपक्रमांमध्ये सहभागी असते.
मी श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचा सचिव या नात्याने आपण सर्व सभासद बंधू-भगिनींचे स्वागत करीत आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये 200 कोटी ठेवी पूर्ण करण्याचा मानस आहे. त्याच पटीने 140 कोटींचे कर्ज वाटप विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून वाढविण्याचा विचार आहे. संस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून 0% एन.पी.ए. करण्यासाठी संचालक व सेवक यांच्या सहभागातून प्रयत्न करण्याचा विचार आहे.
संस्थेकडे एकूण 64 कर्मचारी कार्यरत असून, त्यांना सहकार क्षेत्रामध्ये नवीन होणाऱ्या घडामोडींची माहिती देण्यासाठी सतत प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाते. सर्व सेवक प्रशिक्षित आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून कोअर बँकिंग, एन.ई.एफ.टी., आर.टी.जी.एस. व लॉकर सुविधा सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सचिव - सर्जेराव रामचंद्र शिंदे
शिक्षण- MA

संचालक मंडळ
नाव पद
श्री. अजित जो. थोरात चेअरमन
श्री. चंद्रकांत स. टंकसाळे व्हा. चेअरमन
श्री. सुहास आ. जाधव संचालक
श्री. अरुण ह. पवार संचालक
श्री. चंद्रजीत पा. पाटील संचालक
श्री. शामराव स. पवार संचालक
श्री. भिमाशंकर इ. माऊर संचालक
श्री. अनिल कृ. शिर्के संचालक
सौ. अरुणादेवी वि. पाटील संचालिका
श्री. संभाजी शं. वाघमारे संचालक
श्री. अविनाश ह. पाटील संचालक
श्री. विठ्ठल दा. येडगे संचालक
सौ. उज्वला आ. पाटील संचालिका
श्री. प्रकाश र. यादव तज्ञ संचालक
श्री. सर्जेराव रा. शिंदे मुख्य कार्य. अधिकारी

सल्लागार मंडळ
नाव पद
श्री. पांडुरंग ग. पाटील सदस्य
श्री. वसंत चं. चव्हाण सदस्य
श्री. मारुती दा. रावते सदस्य
श्री. दत्तात्रय आ. लावंड सदस्य
श्री. दगडू आ. पवार सदस्य
श्री. हनुमत दा. गावडे सदस्य
श्री. नंदकुमार ग. सन्मुख सदस्य


संस्थेचे ध्येय
-
सन 2025–2026 मध्ये संस्थेच्या ठेवी 200 कोटी करण्याचा मानस असून त्याच प्रमाणात कर्ज वाटप करणे व निव्वळ एन.पी.ए. 0% वर आणणे.
-
तालुक्यामध्ये बँकिंग सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नवीन शाखा उघडण्याचा मानस.
-
ग्राहकांना आधुनिक बँकिंग सेवा देण्यासाठी कोअर बँकिंग सुविधा.
-
ATM सुविधा पुरविणे.
-
ऑनलाईन संगणक सुविधेद्वारे ग्राहकांना तत्पर सेवा देणे.
-
बँकिंग सेवांबरोबर सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन लोकांच्या समस्या सोडविणे.
-
सभासद व ठेवीदार यांची विश्वासार्हता वाढविणे.
संस्थेची वैशिष्ट्ये
-
संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत.
-
लॉकर सुविधा उपलब्ध.
-
विनामूल्य व तात्काळ सेवा.
-
कर्जाची तात्काळ सुविधा.
-
जेष्ठ नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा.
-
शिक्षकदिनि शिक्षकांचा यथोचित सन्मान.
-
आर्थिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात संस्थेचा सक्रिय सहभाग.
-
नेट बँकिंग पद्धतीद्वारे बँकिंग सेवा.
-
दरवर्षी 1 जून रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
शाखा विस्तार
संस्थेच्या मुख्य कार्यालयासह 22 शाखा आहेत. त्यातील 18 शाखा स्वमालकीच्या व 4 शाखा भाडे तत्त्वावर आहेत. यातील बहुतांश शाखा या ग्रामीण भागात बँकिंग सेवा देत आहेत. उदा. चरेगाव, कोडोली, वडोली निळेश्वर या शाखांचा आवर्जून उल्लेख करता येईल.
संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ
13 संचालक
मुख्य 7 सल्लागार व शाखांचे सल्लागार
-
सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने समाजातील गरीब होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत.
-
प्रसंगानुसार गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदत.
-
खेळाडूंना क्रीडा साहित्याकरिता मदत.
-
आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत.
-
उन्हाळी क्रीडा शिबिरास आर्थिक मदत.
-
दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षकदिनी गुरूजनांचा सत्कार.
-
रक्तदान शिबिराचे आयोजन.
-
ज्येष्ठ नागरिकांचा दरवर्षी सत्कार.
-
महिलांसाठी हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन.
-
महिला मेळावे आयोजित करून महिला सबलीकरण घडवून आणणे.
-
पुरुषांबरोबरच स्त्रियांचीही बँकिंग सहभागिता वाढविण्यासाठी महिलांचे उद्बोधन.
-
कॅशलेस सुविधा व ऑनलाईन व्यवहारांची समाजामध्ये जनजागृती करणे.
संस्थेचे सामाजिक उपक्रम
-
कोअर बँकिंग सुविधा पुरविणे.
-
ATM सुविधा सुरू करणे.
-
संस्थेच्या सेवकांना ड्रेसकोड करणे.
नवीन उपक्रम
वरील प्रमाणे बँकेची सद्यस्थिती असून बँकेने प्रतिकूल परिस्थितीतही दमदार वाटचाल केली असून कराड तालुक्यातील ग्रामीण विभागाला आर्थिक गती मिळावी आणि लोकांचे राहणीमान उंचावावे, तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, उद्योगधंदे व व्यापार वृद्धिंगत व्हावेत या दृष्टीने संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय मा. भाऊ यांनी सातत्याने उदात्त दृष्टीकोन ठेवून संस्थेच्या माध्यमातून भरघोस अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेषतः बेरोजगार तरुणांना वाहन खरेदी, शहरी विभागातील नोकरदार सुशिक्षित लोकांसाठी संगणक खरेदी व अन्य संसार उपयोगी वस्तू खरेदीसाठी संस्थेने नेहमीच अर्थसहाय्य केले आहे. महिला बचत गटांनाही कर्ज पुरवठा केला जातो.
भारताच्या आर्थिक क्षेत्रात विशेषतः महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात 8 नोव्हेंबर 2016 चा प्रचंड उलथापालथ झाली. 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. सर्वांच्या जीवनात उलथापालथ झाली. पतसंस्था अडचणीत येऊ लागल्या. ठेवीदार, सभासदांना रोज रक्कम मिळू शकत नव्हती. अशा वेळी श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेने आपले कर्तव्य चोख बजावले व सभासदांना धैर्य देण्याचा प्रयत्न केला. नोटाबंदीमुळे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या पतसंस्थांना जुन्या नोटा स्वीकारण्याचा अधिकार दिला नव्हता. त्यामुळे पतसंस्थांचे व्यवहार ठप्प झाले.
श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेने सभासद, खातेदार, ठेवीदार यांना रोज रक्कम व इतर बँकांच्या मदतीने डी.डी., आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी. यांच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न केला. नोटाबंदीनंतर शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करत संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. याचे सर्व श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. भाऊ, संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सेवक वर्ग यांना दिले जाते.
एकूणच संस्थेच्या प्रगतीसाठी अनेक उपाय सुचवून योग्य ते मार्गदर्शन करून सल्ला देणारे मळाई समूहाचे नेते, शेती मित्र सन्माननीय मा. अशोकराव थोरात (भाऊ) यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे सहकार बँकिंग क्षेत्रात एक अग्रगण्य संस्था म्हणून श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेची ओळख आहे.
भविष्यात श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
संकलन
मुख्य कार्यालय

निरीक्षक- सुजाता सुनील शिंदे
शिक्षण - M.COM, GDC&A

क्लार्क - रेखा सतिश देसाई
शिक्षण - B.COM, GDC&A

क्लार्क- सुजाता मदन शिंदे
शिक्षण - B.COM

लवाद क्लार्क - राजेंद्र तातोबा येडगे
शिक्षण - BA


सौ. निता लक्ष्मण बुधे (शाखाप्रमुख)
शिक्षण - B.COM
Mobile No. 9850015104
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
21 जुलै 1987
मुख्य कार्यालय शाखा
पुना-बंगलोर रोड, थोरातमळा, जखिणवाडी ता. कराड
मोबा.: ९५६१०००९१२

श्री.दत्तात्रय रामचंद्र यादव (शाखाप्रमुख)
शिक्षण-BA, GDC&A
Mobile No. 9921450089
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा जखिणवाडी
02 नोव्हेंबर 1996
श्री मळाईदेवी मंदिर-जवळ, जखिणवाडी ता . कराड
मोबा.: ७७६७८१५७००
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा शास्त्री नगर
09 मे 1997
सागर हॉटेलच्या मागे, रानडे हॉस्पिटल जवळ, शास्त्री नगर -मलकापूर ता. कराड
मोबा.: ९५६१०००९२२
%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-M_A%20G_D_C%20%26%20A%20%20email%20id-%20nagarshatri74_gma.jpg)
सौ. शर्मिला प्रमोद श्रीखंडे (शाखाप्रमुख)
शिक्षण - MA,GDC&A
Mobile No. 9561000923
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा आगाशिवनगर (अ)
17 फेब्रुवारी 2000
दत्त मंदिर, जवळ आगाशिवनगर
मोबा.: ९५६१०००९२०

श्री. आप्पासो जगन्नाथ पाटील (शाखाप्रमुख)
शिक्षण - BA English
Mobile No. 9623463206

श्री.शशिकांत शंकर एटांबे (शाखाप्रमुख) शिक्षण - B.COM
Mobile No. 9881579833
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा कासार शिरंबे
29 डिसेंबर 2000
ग्रामपंचायत च्या पाठीमागे, कासार शिरंबे
मोबा.: ९५६१०००९१८
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा वसंतगड
10 ऑगस्ट 2001
शाखा वसंतगड
मोबा.: ९५६१०००९२६

श्री. माणिक शिवराम पाटील (शाखाप्रमुख)
शिक्षण - MA
Mobile No. 7507011044
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा मळाई टॉवर्स
07 जून 2002
मळाई टॉवर कोल्हापूर नाका कराड
मोबा.: ९५६१०००९२४

श्री. शिवाजी निवृत्ती भोसले (शाखाप्रमुख)
शिक्षण - MA
Mobile No. 7219717282

श्री. अनिल रामचंद्र पवार (शाखाप्रमुख)
शिक्षण - B.COM, D.B.M.
Mobile No. 9822457912
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था
शाखा मलकापूर
07 जून 2002
भारती विद्यापीठासमोर, मैन रोड मलकापूर
मोबा.: ९५६१०००९१४
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा वडोली निळेश्वर
10 नोव्हेंबर 2002
निळेश्वर मंदिरजवळ, वडोली निळेश्वर ता. कराड
मोबा.: ९५६१०००९३०

श्री. शंकर वसंत पाटील (शाखाप्रमुख)
शिक्षण - BA & GDC&A
Mobile No. 9359346483
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा मार्केट यार्ड
24 जानेवारी 2003
अजंठा पोल्ट्री फार्मसमोर, शुभश्री रेसिडेन्सी
मोबा.: ९५६१०००९३५

सौ. गौरी राजेंद्र जाधव (शाखाप्रमुख)
शिक्षण - MA B.ed, GDC&A
Mobile No. 9158917469
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा कोडोली
24 जानेवारी 2003
स.रा. जि. बँकेजवळ, कोडोली ता. कराड
मोबा.: ९०२८७८२६३४

श्री. संदीप अण्णा लावंड (शाखाप्रमुख)
शिक्षण - BA
Mobile No. 7588638747
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा विद्यानगर
10 ऑक्टोबर 2003
एस.जी.एम. कॉलेजसमोर, विद्यानगर-कराड ,सातारा
मोबा.: ९५६१०००९३२

श्री. हणमंत आनंदराव गायकवाड (शाखाप्रमुख)
शिक्षण - B.COM
Mobile No. 9561000931
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा वाठार
10 ऑगस्ट 2005
एस.टी. स्टँडजवळ, वाठार, ता. कराड
मोबा.: ९५६१०००९३९

श्री. उत्तम पांडुरंग पाटील (शाखाप्रमुख)
शिक्षण - BA
Mobile No. 9673425063
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा चरेगाव
मारुती मंदिराच्या जवळ
10 ऑगस्ट 2005
मोबा.: ९५६१०००९२८
shreemalaidevicharegaon@gmail.com

श्री मनोहर रघुनाथ काटकर
शाखाप्रमुख
शिक्षण - MA, GDC&A
Mobile No. 9970649403
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा सोमवार पेठ
कन्याशाळेजवळ, सोमवार पेठ कराड
मोबा.: ९५६१०००९३४
.jpg)
श्री. संजय तुकाराम दगडे (शाखाप्रमुख)
शिक्षण - BA
Mobile No. 8208625263
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा आगाशिवनगर (ब)
त्रिमूर्ती कॉलनी
फोन: ९५६१०००९२३

श्री. राजेश गजानन शेवाळे (शाखाप्रमुख)
शिक्षण -M.COM, GDC&A
Mobile No. 8432947561
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा नांदलापुर
ग्रामपंचायत जवळ, नांदलापूर
मोबा.: ९५६१०००९३७

श्री. सतीश बबन देसाई (शाखाप्रमुख)
शिक्षण -B.COM GDC&A
Mobile No. 7798335297
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा केसे
17 ऑक्टोबर 2010
स्टोन क्रशरच्या समोर
मोबा.: ९५६१०००९२१

श्री संजय केशव जमाले (शाखाप्रमुख)
शिक्षण -B.COM
Mobile No. 9766208925
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था
शाखा कोयना-वसाहत
18 नोव्हेंबर 2015
पाच मंदिराच्या पाठीमागे, कोयना-वसाहत
मोबा.: ९५६१०००९०८

सौ. प्रतीक्षा दादासो पाटील (शाखाप्रमुख)
शिक्षण -B.COM
Mobile No. 9579285472
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा कुसूर
19 ऑगस्ट 2025
बिरोबा मंदिराजवळ
मोबा.: 9561009902
Events Gallery
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा मल्हारपेठ
23 सप्टेंबर 2025
बँक ऑफ महाराष्ट्रच्या खाली
मोबा.: 9561009904

कु.दत्तात्रय प्रकाश शितोळे (शाखाप्रमुख)
शिक्षण - B.COM
Mobile No. 7218876894

श्री. विकास राजाराम पाटील (शाखाप्रमुख)
शिक्षण -BSC, GDC&A
Mobile No. 9403771828



.jpeg)


























